आरोग्याची वारी हीच पंढरीची वारी २०२०

 

काल रात्री विठ्ठलाशी जी चर्चा झाली सायकल वारी २०२० साठी, तो त्याचा आदेश मी खलील माझ्या ब्लॉग मधे लिहिला आहे, तुम्हाला नक्की आवढेल पूर्ण वाचा । आपला गिरी ।
------------     ------------  ----------

वारी चा मायबाप - पांडुरंग
प्रसंग :- जेव्हा विठोबा सायकल करी वारकरी ला आदेश देतो ( वारी प्रस्थान पुरविची एक रात्र )

उठ उठ काय झोपतोस रे, उद्या वारी प्रस्थान आहे विसरलास का ? हे पहा मी या साठी तुझ्या  स्वप्नात आलो आहे
कि घाई नको आणि दुखी पण होऊ नको , तू जिथे आहेस तिथे थांब , मला माहितीआहे तू आणि तुझे सायकल करी मागील ४-५ वर्ष पासून या दिवसाची आस लावून असतात , मला भेटण्यासाठी .

हे पहा हे कलयुगातील संकट आहे, तुम्ही कर्म जसे कराल तसे तुम्हास भरावे लागेल. तुम्ही नित्य नियमाने माझी सेवा करता मग काळजी नको , मी आहे आणि आपण भेटू नक्की. मी तिथे पण आहे आणि जिथे माझा सायकल करी झालेला वारकरी आहे तिथे पण मी आहे , मी तुझ्यात पण आहे आणि तुझ्या सायकलीत पण आहे , तुझ्या सायकल च्या चाका मध्ये जी हवा आहे तो माझा श्वास आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, मग घाई कशाला करतोस थांब कि घरी ह्या वर्षी, हे पहा आपला नियम सरळ आणि एकदम सोपा आहे , जिथे माझा सायकल करी तिथे माझा वारकरी आणि तीच त्याची पंढरी !!! बोल जोराने जय जय राम कृष्ण हरी !!! अजून बराच तुला बोलायचे आहे, झोपू नको रे गाढवा, मी तोच विठ्ठल आहे ज्याच्या भेटी साठी तुम्ही २५० कमी चा प्रवास सायकल वरून करून येत , हो एका दिवसात, कशाला येत रे, असो माझे सर्व भक्त असेच वेढे असतात म्हणून मी त्यांच्या सोबत नेहमी असतो !! हरे हरे !!  

दरवर्षी तुम्ही येता माझ्या भेटी साठी, तुमची ती तयारी , ओढ आणि प्रेम हि निस्वार्थ सेवा आजच्या कलीयुगात फार कमी पाहायला भेटते. मला आज पण आठवते २०१६ साली तुमीहि एका हाताच्या बोट इतके मिळून आला होतात , दुसऱ्या वर्षी २०१७ ला तुम्ही तर दोन हाताच्या माझ्या बोट इतके सायकलकरी. तुच्या त्या वारी चा प्रसार येवढा झाला कि माझे काही अजून भक्त तुमच्याशो जोडल्या गेले , २०१८ ला मग तुम्ही तर २५० ची अक्खी एक टीम घेऊन आलात. तुमचे ती भेट माझ्या गाभाऱ्यात रात्रीच्या माझ्या शेज आरती नंतर झाली , तुमच्या त्या चेहर्या वरील प्रसन्नता आणि डोळ्यातील ते सुखद अश्रू पाहून मी त्या रात्री आणि तुम्ही पुण्यया पर्यंत घरी पोहचे पर्यंत मी झोपलो नाही.

२०१९ ला तुम्ही अक्खी ७०० भक्तांची सायकल दिंडीच घेऊन आलात, माझी पांढरी सुखावून गेली ती थकलेली सायकल करी पाहून, फक्त आणि फक्त माझ्या भेटी साठी आलेल्या भक्ता पोठी. मी तो क्षण कधी हि विसरू शकत नाही. तुमची सर्वांची ती असीम भक्ती आणि आस नेहमी टिकून राहणार असा मी तुम्हाला आशीर्वाद दिला होता. त्या नंतर तुम्ही सर्वांनी मिळून २०२० साठी खूप आधीच तयारी केली होती पण बाळा निसर्ग पुढे तुझा पांडुरंग जो आज तुझ्या शी बोलताय तो पण आज काही नाही करू शकणार , हि सर्व मानवी कर्माची फळे आहेत आणि त्याची हि शिक्षा असे तू समाजशील का ?

तू काळजी नको करू , मी तुझी वारी पूर्ण करून घेणार आणि ती पण प्रस्थान ते माझ्या आषाढी एकादशी पर्यंत, त्या साठी तुला पंढरी ला येण्याची गरज नाही, तू जिथे आहेस तिथे थांब आणि स्वतःचे स्वास्थ्य कसे तुला निरोगी ठेवता येईल त्याच्या साठी प्रयंत्न कर आणि त्या जीवन शैयली ला आयुष्य भर करत जा. तू असेल निरोगी तर तुझे घर परिवार मित्र ग्राम राज्य आणि तुझा देश निरोगी होणार, हीच ती वेळ जे तुम्ही म्हणता सध्या न, मग तीच हि वेळ आहे. मी तुला सांगतोय आणि तू तुझ्या सर्व मित्र ना सांग.

आज घरी राहून वारी करा, तंदरुस्त राहा व्हा आणि कोरोना सारख्या कली पासून सावध होण्याची गरज आहे तुम्हाला. काली कुठल्या न कुठल्या रूपाने कलियुगात येणार आणि जसा मी विटेवर थांबून तुमचे रक्षण करतोय , तसे तुम्ही घरी राहून त्याच्यावर विजय मिळवा.

चल मला पंढरी ला जायचे आहे आणि आता पहाठ होत आहे, मी जे तुला संगीतले ते कर, घरी राहा वारी कर. आणि २०२१ ला ये कि तुझी अफाट सायकलकरी भक्त घेऊन, करूया रिंगण करूया विठ्ठल भक्तांचा गजर, हो होणार माझा सायकल करी वारकरी २०२१ ला पण !!!
--------------
जय जय राम कृष्ण हरी !!! सायकल वारी एक निस्वार्थ सेवा !!!
घरी रहा सुरक्षित राहा !!! सायकल चालवा उत्तम आरोग्य साठी !!!
गिरी ( इंडो ऍथलेटिक सोसायटी पुणे )