IAS ची वारी फिटनेस वारी

IAS ची वारी!!  फिटनेस वारी !! 

|| अरे थोडी खोटी थोडी खरी 
IAS ची वारी फिटनेस वारी  ||

गेलो नाही  पंढरपुरी,
करोनाचा त्रास भारी,
माऊलीचा आदेश जारी ,
म्हणूनच करा ही फिटनेस वारी.

||  अरे थोडी खोटी थोडी खरी 
IAS ची वारी फिटनेस वारी  ||

सायकल ,स्वीमची मौजच न्यारी 
रुनिंग आहे अवघड जरी
सुर्यनमस्कार घाला तुमच्या दारी
म्हणूनच करा ही फिटनेस वारी 

|| अरे थोडी खोटी थोडी खरी 
IAS ची वारी फिटनेस वारी  ||

हॉल ,बेडरूम ,टेरेस जरी 
व्यायाम करा घरच्या घरी 
करोना फरोना जाती दुरी 
म्हणूनच करा ही फिटनेस वारी

|| अरे थोडी खोटी थोडी खरी 
IAS ची वारी फिटनेस वारी  ||

आय ऐ एस चे वारकरी
हाथ जोडून विनंती करी
मनात असेल  श्रध्दा खरी
करत राहा ही फिटनेस वारी 

|| अरे थोडी खोटी थोडी खरी 
IAS ची वारी फिटनेस वारी  ||

##  शंकर उणेचा ##
एक सायकलकरी वारकरी
इंडो ऐथलेटिक्स सोसायटी
चिंचवड, पुणे....१६.०६.२०२०.
९८२२४५६५९५...