मी अनुभवलेली IAS फिटनेस वारी २०२०

मी अनुभवलेली IAS फिटनेस वारी २०२०

************************************************************

( इथे : "मी" हा स्वतः सावळा हरी आपल्या "पंढरपूरचा पांडुरंग" )

प्रसंग : द्वादशी चा दिवस गुरुवार २ जुलै २०२०, स्वतः विठ्ठल भक्तास भेटून मा मोकळे करतो !

************************************************************

अरे अरे काय करून टाकलास स्वतःला रे तू , कसा होतास तू प्रस्थान च्या आधी आणि काय हे एकादशी नंतर चे तुझे हे रूप . किती ते तुझे गुब गुबीत गाल होते, तुझा तो रुबाबदार वजनदार पहेलवानी शरीर कुठे गेले, कुठे गेले ते तुझे बकासुरी झोप आणि ते कुंभकर्णना सारखे आहार, काय हि अवस्था तू चक्क रोज सगळी घरची कामे पण करतोस अगदी कापडी आणि भांडी धूतोस , फारशी आणि कार पुसतोस अरे अरे अरे , याला काय म्हणावे चांगले का वाईट ? हा कोरोना नवा च्या कली चा प्रादुर्भाव तर नाही ना ? कि काय ते फिटनेस वारी म्हणे त्याचे हे फायदे ?

असो पण मनातले सांगू , तुझे हे नवीन रूप पाहून मला पण राहवले नाही , म्हणून कधी एकादशी येते आणि कधी मी तुझ्या कडे येते द्वादशी ला असे झाले होते मला. मग काय घेतले पुष्पक आणि भुर्रर्रर्र कण आलो तुझ्या कडे.

हो मला आठवते ते सर्व दिवस जेव्हा मी तुला प्रथम च्या एक दिवस आधी येऊन भेटलो आणि तुझी वारी होणार असे तुला सांगितले होते, पण ती कशी कधी कुठे , हे तुला ठरवायचे होते आणि ते तुम्ही एका नवीन संप्रदाय प्रमाणे पूर्ण केली याचा मला खूप अभिमान वाटतो .

तुम्ही तर पूर्ण ह्या वर्षी माझ्या त्या पाइ वारी सारखे १८ दिवस हि काय ते आरोग्याची वारी करून माझी ती नजर तुमच्या वरती ठेवण्यासाठी भाग पडलात. दिवस पहिला तर एक्दम झोश आणि होश याचा मिलन होता, तुमचा सर्व वेळ सर्वांना माहिती देण्यात गेला, तुम्ही तर पहिल्याच दिवशी डबल शतक मारले वारकरी नोंदणी चे, वाह रे माझ्या आधुनिक दिंडी पुढार्यांनो, एक्दम झकास. मग काय वारी च्या काही दिवसात तुम्ही मोठा वारकरी समुदाय गोळा करून घेतलात, तुला माहिती आहे ते का तुम्हाला जोडले गेले, कारण तुमचे ते निस्वार्थ सेवा वारी साठी आणि सर्वांच्या पुढे आरोग्याचा संदेश नेण्या साठी.

तुमचे ते रोज चे पोस्ट पाहून मी तुमच्या whatsapp आणि facebook मध्ये माझे एक अदृश्य खाते काढले बरं का, कारण तुम्ही आता आधुनिक वारकरी बुवा, मस्करी करतोय, तुमच्यात पण तीच भावना प्रेम श्रद्धा मी पहिली आहे वारी आणि विठ्ठल भक्ती पोठी, सुखी राहा.

कधी तुम्ही योग प्राणायाम करता, तर कधी सूर्य नमस्कार. काही तर ऍब्स पोटाचा व्यायाम करता, हो का नाही कारण वडापाव मिसळ पाव  चे परिणाम. काही मंडळी रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमाने हाल चाली करत होतात. अरे सायकलिंग तर तुम्ही सोडणार नाही माहिती होते आणि काही रनिंग चे वेडे होते. काही जण बाहेर जाण्याच्या टळत होते आणि आपल्या घराच्या टेरेस वर काय ते शंभरी फेऱ्या मारत होते, अजून तर काय माळे चढणे आणि उतरणे ते पण ५०-१००, अरे काय ते वेड होते तुमचे माझ्या साठी वारी साठी. असो आरोग्य साठी तुम्हा सर्वाना चांगली सवय लागली, यात्तच तुमचा आणि माझा आनंद.

हि वारी नुसती फिटनेस ची नव्हती तर आधुनिक आरोग्याची होती, का नाही बुवा, तुमच्या ह्या ग्रुप मध्ये तुम्ही सगळे शहरातली IT मधली मंडळी आणि तुमचे आधुनिक विचार जुन्या रीतीनं जपून, खूप छान. तुमचे ते सर्वाना STRAVA ला जोडणे, वारी चा फलक म्हणजे काय ते डॅशबोर्ड तयार झाला, खूप छान ती भेट तुम्ही दिली मला. काही दिवसात तुमच्यात ले काही दिवस रात्र ह्या आधुनिक पर्यायावर काम करून एक नवीन मोबाईल aap तुम्ही तयार केलात, हि तर एक मेकांना अधिक जवळ आणणारी माध्यम ठरली, का नाही तुमचे मी आभार मानावे ?

अजून एक अनुभव मला तुला सांगायचं आहे, ह्या आरोग्याच्या वारीत तुम्ही तुमच्या परीवाला ला सामील केलात आणि हीच आज च्या काळाची गरज आहे, कारण परिवारात कोणी एकाने आरोग्य राहून चालणार नाही, सर्व फिट तर भारत फिट. मी पाहिलेत ते तुमचे ६० वर्षाचे यंग वारकरी आणि निरागस छोटे सुद्धा योग आणि व्यायाम करताना रोज ह्या वारी मध्ये. काही जणांनी तर त्यांच्या सायकलिंग चे काही उत्तम माईलस्टोन मिळवलेत जसे १०,१५,२० आणि ७० सुद्धा बरं का. काही जणांनी माझ्या दिवे घाटातील अखंड प्रतिमेला सेल्फी कडून वारी पूर्ण केले अँड i like it  . मी तर सूर्य नमस्कार १५ ते २० करणारे पहिले होते तुम्ही तर काही शंभरी मध्ये करत होतात, आणि सूर्य देव बोलले कि.

तुमची ती आस तुम्हाला जसी जसी एकादशी जवळ येत होती तशी तशी तुम्ही वारी अजूनकाशी पूर्ण करू ह्याच विचारत होतात, तुमच्यात ले काही तर नि virtual सायकलिंग ची तयारी केली आणि पूर्ण पण केली त्याचा तर मला खूप खूप अभिमान वाटत आहे, बरं हे असे जर तुम्ही दार वर्षी करणार नाही घरून सायकल वारी, असेच रे मणी विठ्ठल पहावा विठ्ठल. तुम्ही साठवलेल्या अनेक मागील आठवणी आणि काही नवीन ब्लॉग पण मी वाचलेत बरं कां, आणि मला पण त्या तुमच्या दमदार जोरदार फिटनेस वारी गाण्याने एक नवीन ऊर्जा दिसत आहे, कुठे ? अरे इथे स्वर्ग लोकात पण, हो. माझे काही देवलोक जे अनफिट झाले होते ह्या लोकडाऊन मध्ये कारण भक्त सगळे घरी होते आणि काही कोणाचे प्रश्न येत नसे, तर आमची पण कामे कमी होती राजा. सांग त्या तुझ्या दादा ला कि पुढच्या एकादशीला मला असेच काही दमदार गीत हवे आहे, सांगशील ना ?

आली एकादशी आणि केली वारी तुम्ही सर्वांनी आरोग्याची फिटनेस वारी , सुखी रहा निरोगी रहा.

काळजी करू नकोस तुझे नाव टॉप ५० मध्ये नसले तरी कारण वारी मध्ये स्पर्धा नसते. मग मिळाले का रे तू ला तुझे सर्टिफिकेट ?

चाल मला खूप कामे आहेत मी जातो पंढरीला आता, त्या कोरोना चा बंदोबस्त करतो आणि हो पुढ्यच्या वर्षी ये तुझी फौज घेऊन सायकलवारी ला.

तुझा आणि तुम्हा सर्वांचा - सावळा हरी पांडुरंग

 

- Giriraj Umrikar

#IndoAthleticSociety #IASFitnessWari #Wari2020